Belagavi

अचानक लागलेल्या आगीत घर आणि साहित्याचे मोठे नुकसान

Share

घरात कोणीही नसताना अचानक लागलेल्या आगीत ३० ग्रॅम सोनं सहित घरातील वस्तू जळून खाक झाल्याची घटना गुरुवारी घडली.

बेळगाव तालुक्यातील अरळीकट्टे गावातील आंबेडकर गल्ली येथील दोराची व्यापारी असलेले अजप्पा हरिजन यांच्या घराला गुरुवारी अचानक आग लागली. घरातून धूर निघताना पाहून शेजारील रहिवाशांनी दोर विक्रीसाठी बैलहोंगल बाजारात गेलेले अजप्पा हरिजन यांना तात्काळ माहिती दिली. अजप्पा यांची पत्नी अंगणवाडी सेविका असून त्या अंगणवाडीत तर मुले शाळेत गेली असल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.

घरातील ३० ग्रॅम सोनं, ६८ हजार रुपये रोख, १.८० लाख रुपये किमतीचा दोरांचा साठा, तसेच टीव्ही, फ्रीज व अन्य घरगुती वस्तू आगीत पूर्णतः जळून खाक झाल्या. बेळगाव ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून अग्निशमन दलाने घटनास्थळी भेट देऊन या आगीच्या कारणांची चौकशी सुरू केली आहे.

Tags: