बेळगाव शहरातील अरिहंत हॉस्पिटलने लहान मुलांसाठी मोफत हृदयरोग तपासणी शिबिराचे आयोजन केले आहे. हे शिबिर शनिवार, १२ जुलै रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत होणार आहे.

या शिबिरात बाल हृदयरोगतज्ज्ञ डॉ. गोविंद औरादकर मुलांची तपासणी करतील. यात रक्तदाब (बीपी), रँडम ब्लड शुगर (आरबीएस), ईसीजी आणि इको या तपासण्या मोफत केल्या जाणार आहेत.
धाप लागणे, वारंवार सर्दी होणे, छातीत धडधडणे, वाढीच्या समस्या आणि मूल खूप रडल्याने शरीर निळे पडणे यांसारख्या हृदयाशी संबंधित समस्या असलेल्या मुलांची या शिबिरात तपासणी केली जाईल. पालकांनी या मोफत शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन अरिहंत हॉस्पिटलने केले आहे.


Recent Comments