आषाढवारी आणि पंढरीनाथाच्या दर्शनासाठी प्रत्येक भाविक आतुरलेला असतो. आज शुक्रवार दिनांक 4 जुलै रोजी बेळगाव ग्रामीण भागातील राजहंसगडचे वारकरी व भाविक आषाढी यात्रेसाठी भक्तिमय वातावरणात पंढरपूरला रवाना झाले. आषाढी एकादशी जसजशी जवळ येईल तशी प्रत्येक वारकर्याला विठुरायाच्या दर्शनाची ओढ खुणावत असते, त्यामुळे महिना अगोदरपासूनच काही वारकरी पायी दिंडी करत तर काही वारकरी वाहनांची व्यवस्था करून पंढरपूरकडे प्रयाण करत असतात, त्याची प्रचिती आज राजहंसगड मध्येही पाहायला मिळाली.

रविवारी होणाऱ्या आषाढी एकादशीसाठी सालाबाद प्रमाणे यावर्षीही राजहंसगड वारकऱ्यांचा गावांमध्ये दिंडी सोहळा दिमाकात पार पडला. गावातील विविध गल्लोगल्ली पार पडलेल्या दिंडी सोहळ्यानंतर सर्व वारकरी आणि भाविक भक्तिमय वातावरणात पंढरपूरकडे रवाना झाले.

तत्पूर्वी दरवर्षीप्रमाणे बेळगाव नगरीतून जात असताना वाटेतच बेळगाव ग्रामीणच्या आमदार तर कर्नाटक राज्याच्या मंत्रिमहोदया सौ. लक्ष्मीताई हेब्बाळकर यांच्या निवासस्थानी थोड्या वेळासाठी दिंडी थांबविण्यात आली. त्यावेळी तेथे मंत्री महोदया सौ. लक्ष्मीताई हेब्बाळकर यांच्या अनुपस्थितीत त्यांची मातोश्री, तसेच त्यांचे बंधू व भगिनी यांनी दिंडीतील वारकऱ्यांची तसेच विना व तुळशीची आपल्या स्वगृही पूजा अर्चा करून वारकऱ्यांना प्रसाद देऊन पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या…

आजचा दिंडी सोहळा व आषाढी पंढरपूर यात्रा सोहळा संपन्न करण्यासाठी गावातील माजी तालुका पंचायत सदस्य सिद्धाप्पा छत्रे व माजी ग्रामपंचायत उपाध्यक्ष दत्ता पवार यांच्या मार्गदर्शनाखाली श्री शंकर हलगेकर, परशराम निलजकर, मारुती तावशे, प्रशांत वालेकर, पिंटू कुंडेकर, महादेव थोरवत सह इतरांनीही परिश्रम घेतले………


Recent Comments