Belagavi

जैन मुनी शिष्यांचा बेळगावात भव्य प्रवेश

Share

चातुर्मासाच्या निमित्ताने १५०० किलोमीटरची पायी यात्रा करून जैन मुनींच्या शिष्यांचे बेळगावात आगमन झाले. त्यानिमित्ताने शहरातील जैन समाजाने त्यांचे भव्य स्वागत केले.

चातुर्मासाच्या पार्श्वभूमीवर जैन मुनींच्या शिष्यांचा बेळगाव शहरात भव्य प्रवेशोत्सव पार पडला. सुमारे १५०० किलोमीटर पायी प्रवास करून पूजनीय सुमन सूर्योदयाश्रीजी यांच्या शिष्या, पूजनीय तपस्वी रत्‍ना रत्‍नज्योतीश्रीजी यांच्या शिष्या, वर्धमान तपारोधिक पूजनीय अक्षयज्योतीश्रीजी यांच्या शिष्या, पूजनीय निराग ज्योतीश्रीजी यांच्या शिष्या, पूजनीय विरम ज्योतीश्रीजी यांच्या शिष्या, पूजनीय नित्यम ज्योतीश्रीजी यांच्या शिष्या आणि पूजनीय पुण्यम ज्योतीश्रीजी यांच्या शिष्यांसह इतर मुनीगणांनी आज बेळगावात प्रवेश केला.

बेळगावातील पांगूळ गल्ली येथील मारवाडी स्थापित श्री चंद्रप्रभ जैन मूर्तीपूजक संघाने मुनीगणांचे भव्य स्वागत केले. संयुक्त महाराष्ट्र चौक, खडे बाजार, भेंडी बाजार मार्गे पांगूळ गल्लीपर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर मांगलिक प्रवचन, पूर्णाहुती, नवकारसी आणि सामूहिक प्रभावना कार्यक्रम पार पडले.

उत्तम सरेमलजी, विजय पोरवाल, राजू खोडा, उत्तम पोरवाल, विजय संघवी, महेश पोरवाल, राजू दुमावत, रामेश खोडा, महेंद्र पोरवाल, डायमंड दोशी, मुकेश खोडा, विक्रम जैन यांच्यासह अनेकांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

Tags: