मान्सूनची सुरुवात झाली असून, लवकरच श्रावण महिनाही येत आहे. जर तुम्ही सण-समारंभासाठी कपड्यांची विशेष धमाका ऑफरमध्ये खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर बेळगावच्या कार्तिका सारीजला नक्की भेट द्या.


बेळगावसह कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोव्यातील लोकांचे प्रेम व विश्वास संपादन केलेल्या बेळगावच्या कार्तिका सारीजने दरवर्षीप्रमाणे यंदाही मान्सून ऑफर सुरू केली आहे.

बेळगाव शहरातील गणपत गल्ली येथील कार्तिका सारीजमध्ये एकाच छताखाली लहान मुले, महिला, पुरुष, वृद्ध या सर्वांसाठीचे तयार कपडे, साड्या, शुभ समारंभांसाठी भेट देण्यासाठीच्या साड्या, शुभ कार्यांसाठी स्टील आणि इलेक्ट्रिकल भेटवस्तू तसेच इतर वस्तू ग्राहकांना परवडणाऱ्या दरात उपलब्ध आहेत.

इतकी वर्षे ग्राहकांचा विश्वास संपादन केलेल्या कार्तिका दरवर्षी श्रावण महिन्यापासून दसरऱ्यापर्यंत विशेष मान्सून ऑफर सुरू करते. या वर्षीही १५ जूनपासून मान्सून ऑफर सुरू झाली आहे. येथे २०० रुपयांपासून भेट देण्यासाठीच्या साड्या, कांजीवरम, धर्मावरम आणि विविध प्रकारच्या सिल्क साड्या ग्राहकांना परवडणाऱ्या दरात उपलब्ध आहेत. याशिवाय, ‘बाय वन गेट टू’ म्हणजेच एका खरेदीवर दोन मोफत ही ऑफर देखील सुरू असून, ग्राहक त्याचा पुरेपूर फायदा घेत आहेत.

बेळगाव हे महाराष्ट्र आणि गोवा राज्यांना जोडणारा दुवा असल्याने, येथील ग्राहकांसाठीही कार्तिका हे कपड्यांचे आवडते दुकान बनले आहे. ही मान्सून ऑफर श्रावण महिन्यापासून दसरऱ्यापर्यंत सुरू राहणार आहे. पुरुष आणि महिलांच्या तयार कपड्यांवरही आकर्षक ‘डबल धमाका’ ऑफर ग्राहकांना आकर्षित करत आहेत.
लग्नसमारंभ, सणवार आणि शुभ समारंभांसाठी आवश्यक असलेल्या सर्व प्रकारच्या नवीन व्हरायटीच्या साड्या आणि कपडे ‘डबल धमाका’ ऑफरमध्ये खरेदी करता येणार आहेत.
तर मग वाट कसली पाहताय, बेळगावच्या गणपत गल्ली येथील कार्तिका सारीजला आजच भेट द्या!


Recent Comments