Belagavi

वीज तारेच्या धक्क्याने तीन म्हशी, एक घोडा ठार

Share

बेळगाव जिल्ह्यातील मुडलगी तालुक्यातील आरळीमट्टी गावात वीज तारेच्या धक्क्याने तीन म्हशी आणि एक घोडा यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

मुडलगी तालुक्यातील आरळीमट्टी गावात शंकर समगार यांच्या मालकीच्या तीन म्हशी आणि एक घोडा वीज तारेच्या धक्क्याने जागीच ठार झाले. जनावरांच्या गोठ्यात बांधलेली असताना, पावसामुळे आणि वादळामुळे वीज तार तुटून जनावरांवर पडली. यावेळी खाली बांधलेल्या तीन म्हशी आणि एका घोड्याला विजेचा धक्का लागून त्यांचा मृत्यू झाला. कुटुंबाचा आधार असलेल्या म्हशी गमावल्याने कुटुंबियांना अश्रू अनावर झाले आहेत.

ही घटना मुडलगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.

Tags: