Belagavi

लक्ष्मीनगरच्या श्री महालक्ष्मी मंदिर समितीची नवीन कार्यकारिणी

Share

लक्ष्मीनगर येथील श्री महालक्ष्मी मंदिराची वार्षिक सभा नुकतीच पार पडली.

या सभेत सन २०२५ ते २०२८ या तीन वर्षांच्या कालावधीसाठी नवीन पदाधिकारी आणि कार्यकारिणीची एकमताने निवड करण्यात आली. यामध्ये दत्ताजी वामनराव कानूरकर यांची अध्यक्षपदी, तर किशोर मोहनराव ऊरणकर यांची कार्याध्यक्षपदी निवड झाली आहे. राजन रमेशराव टाकळकर उपाध्यक्ष म्हणून, धिरज भाटे कार्यदर्शी म्हणून, आणि नामदेव रेडेकर खजिनदार म्हणून जबाबदारी सांभाळतील.

कार्यकारिणीचे इतर सदस्य म्हणून शिवाजी पी. बाडीवाले, प्राजक्त केकरे, श्रीकांत लोकरे, कृष्णा पी. बाडीवाले, सुरेश पाटील, दिनकर गवस, श्रीकांत चिक्कोर्डे, रमेश सुरेश रेडेकर, जगदीश पाटील, डॉ. सतीश दिवटे, सूर्यकांत गावडे, शंकर गर्दे आणि नंदेश दळवी यांची निवड करण्यात आली आहे.

Tags: