बेळगावच्या अशोक चंदरगी यांना कर्नाटक स्वाभिमानी वेदिकेतर्फे दरवर्षी दिला जाणारा ‘चंपा सिरीकन्नड’ पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

हा पुरस्कार दिवंगत चंद्रशेखर पाटील यांच्या स्मरणार्थ दिला जातो. बेंगळुरू येथील रवींद्र कलाक्षेत्राच्या नयन सभागृहात नुकताच हा पुरस्कार सोहळा पार पडला. ख्यातनाम साहित्यिक डॉ. बरगूर रामचंद्रप्पा यांच्या हस्ते अशोक चंदरगी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कन्नड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष पुरुषोत्तम बिळीमळे उपस्थित होते. चंपा यांच्या कन्या मीना पाटील, वेदिकेचे अध्यक्ष शंकर हूगार, कन्नड जनशक्ती केंद्राचे अध्यक्ष सी. के. रामेगौडा यांच्यासह इतर अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.


Recent Comments