२१ जून रोजी साजरा होणाऱ्या विश्व योग दिनाच्या निमित्ताने, बेळगावातील के.एल.ई. बी. एम. कंकणवाडीआयुर्वेद महाविद्यालयात ‘मयुरा योगासन’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

के.एल.ई. बी. एम. कंकणवाडी आयुर्वेद महाविद्यालयात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी २१ जून रोजी ११ वा विश्व योग दिन साजरा करण्यात येत आहे. याच निमित्ताने दिल्लीच्या मोरारजीराव देसाई योग अनुसंधान केंद्र आणि बेळगावातील के.सी.पी.आर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मयुरा योगासन’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

या स्पर्धेत यावर्षी १२० हून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला. तसेच, जिल्ह्याच्या विविध भागांतून परीक्षकही उपस्थित होते.
के.एल.ई.बी. एम. कंकणवाडी आयुर्वेद महाविद्यालयाच्या ‘स्वस्थवृत्त आणि योगा’ विभागाचे प्रमुख, प्रो. डॉ. संदीप सागरे यांनी सांगितले की, यावर्षी सुमारे १८ विविध योगा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यात ८ ते १२ वर्षे वयोगट, १३ ते १७ वर्षे वयोगट, १८ ते २२ वर्षे वयोगट, २२ वर्षांवरील वयोगट, भरत नाट्य योगा, तालावर आधारित योगा, योगा रांगोळी आणि के.एल.ई. संस्थेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठीही योगा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

गोकाक तालुक्यातील बळोबा सरकारी कन्नड वरिष्ठ प्राथमिक शाळा, इंचल शाळा, के.एल.ई. इंटरनॅशनल स्कूल, संजय घोडावत स्कूल, मुरलीधर योगा केंद्र यासह इतरही शाळांमधील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला.


Recent Comments