Banglore

चेंगराचेंगरीच्या राजकारणावर डी.के. शिवकुमार संतापले; भाजपवर ‘प्रेतांवर राजकारण’ करत असल्याचा थेट आरोप

Share

बंगळूरु चेंगराचेंगरी प्रकरणात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी जबाबदारी घ्यावी, या भाजपच्या आरोपावर उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी जोरदार प्रत्युत्तर देत, “भाजपवाले प्रेतांवर राजकारण करत आहेत,” असे म्हटले आहे.

बंगळूरुमध्ये माध्यमांशी बोलताना त्यांनी भाजपच्या आरोपांना उत्तर दिले. ते म्हणाले, “आम्ही भाजपच्या लोकांना खांद्यावर घेऊन मिरवणूक काढू. ते प्रेतांवर राजकारण करत आहेत. देशात रेल्वे स्टेशन, मंदिरे आणि अशा अनेक ठिकाणी अशा घटना घडल्या आहेत, पण आम्ही कधीही केंद्र सरकारबद्दल काही बोललो नाही. त्यांच्यासारखं आम्ही राजकारण करत नाही. चेंगराचेंगरी ही एक आकस्मिक घटना आहे आणि त्याचे दुःख आम्हालाही आहे. या घटनेत कोणाला शिक्षा द्यायची आणि काय कारवाई करायची, हे सर्व सरकार करत आहे. त्यासाठी आयोगही नेमण्यात आला आहे. काही म्हणायचे असेल तर त्यांनी आयोगाला सांगावे.”

डी.के. शिवकुमार पुढे म्हणाले की, भाजपच्या लोकांना कोणताही सामाजिक कार्यकर्ता साथ देत नाहीये. सत्ता नसल्यामुळे ते हताश झाले आहेत आणि प्रेतांवर राजकारण करत आहेत. त्यांना माझी भीती वाटते, त्यामुळे ते असे बोलत आहेत. शिवकुमार यांनी २०२८ मध्ये पुन्हा आपणच विधानसौधसमोर शपथ घेऊ, असा विश्वास व्यक्त केला.

Tags: