Belagavi

बेळगावच्या समाजसेवक मुख्तार इनामदार यांना ‘राष्ट्रीय फिनिक्स ग्लोबल अवॉर्ड’!

Share

बेळगावचे प्रसिद्ध समाजसेवक मुख्तार इनामदार यांना त्यांच्या उल्लेखनीय समाजसेवेसाठी ‘राष्ट्रीय फिनिक्स ग्लोबल अवॉर्ड-२०२५’ प्रदान करून गौरवण्यात आले.

कै. बसवंत नागू शिंगाडे सेवाभावी संस्थेच्या वतीने मुख्तार इनामदार यांच्या समाजकार्याची दखल घेत त्यांना हा प्रतिष्ठेचा ‘राष्ट्रीय फिनिक्स ग्लोबल अवॉर्ड-२०२५’ देऊन सन्मानित करण्यात आले.

या पुरस्कार प्रदान सोहळ्याला ह.भ.प. एम.पी. पाटील, डॉ. प्रकाश कदम, डॉ. विक्रमसिंग जाधव, डॉ. अनिल मडके, विठ्ठल हावण्णवर, डॉ. अमीर शेख, डॉ. पांडुरंग पाटील, डॉ. विराट गिरी, मोहन मालवणकर, ज्योती आदाटे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Tags: