Belagavi

बेळगावमध्ये ‘अन्विता फाउंडेशन’चे उद्घाटन

Share

निसर्गामुळे होणारे नुकसान लक्षात घेऊन वाहन सुरक्षितपणे चालवावे. स्वतःच्या आणि इतरांच्या सुरक्षिततेसाठी रस्ते सुरक्षा नियमांचे पालन करावे, असे आवाहन बेळगावचे वाहतूक एसीपी शिवाजीराव निकम यांनी केले. आज बेळगावच्या कन्नड भवनात रस्ते सुरक्षा आणि महिला सक्षमीकरणाच्या उद्दिष्टाने सुरू झालेल्या ‘अन्विता फाउंडेशन’चा लोकार्पण सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून एकस कंपनीचे प्रमुख बसंत पाटील, वाहन प्रशिक्षण संस्था संघटनेचे राज्याध्यक्ष आनंद पाटील, सह-संस्थापक बसवराज कडाली, संस्थेचे सचिव नागराज एच.सी., कृष्णगौडा, डॉ. स्फूर्ती मास्तीहोळी, वाहतूक एसीपी शिवाजीराव निक्कम यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

अन्विता फाउंडेशनचे उद्घाटन करून बोलताना वाहतूक एसीपी शिवाजीराव निक्कम म्हणाले, काहीवेळा नैसर्गिक आपत्ती अपघातांना कारणीभूत ठरू शकतात. त्यामुळे वाहन चालकांनी एकाग्रतेने वाहन चालवावे. वाहन चालवताना इतर गोष्टींचा विचार न करता, स्वतःच्या आणि लोकांच्या सुरक्षिततेचा विचार करावा. रस्ते सुरक्षा नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. हे नियम इतरांसाठी नाहीत, तर आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी वाहन प्रशिक्षण संस्था संघटनेचे राज्याध्यक्ष आनंद पाटील म्हणाले, घाई हीच अपघाताचे मूळ कारण आहे. त्यामुळे आपल्या नियोजित स्थळी वेळेवर पोहोचण्यासाठी लवकर निघावे. सुरक्षा नियमांचे पालन केल्याने अपघात टाळता येतात. रस्त्यावर प्रवास करताना वृद्ध आणि मुलांची काळजी घ्यावी. वाहन प्रशिक्षण संस्था संघटनेचे वसंत पाटील यांनी सांगितले की, रस्ते सुरक्षा आणि महिला सक्षमीकरण हेच अन्विता फाउंडेशनचे मुख्य उद्दिष्ट आहे. रस्ते सुरक्षेमुळे जीवितहानी टाळता येते आणि महिला सक्षमीकरणाने समाजाचा विकास करता येतो. यावेळी अजयकुमार कडाली यांच्यासह अनेकांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

Tags: