बेळगावातील सुळगा ग्रामपंचायत हद्दीतील एका खासगी वसाहतीमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीचा संशयास्पदरित्या मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. खानपूर तालुक्यातील गस्टोळी गावातील रहिवासी असलेला कुबेर देमण्णा दळवाई हा गेल्या २० दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार नंदगड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती.

यासंदर्भात माहिती देताना महादेव सगरेकर यांनी सांगितले की, मृत कुबेर दळवाईचे कोणाशीही भांडण नव्हते. मात्र काल रात्री सुळगा ग्रामपंचायत हद्दीतील एका खासगी वसाहतीमध्ये त्याचा मृतदेह संशयास्पदरित्या आढळला आहे. या प्रकरणी काकती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Recent Comments