बेळगावमध्ये राष्ट्रीय लोकअदालतचे आयोजन १३ जून रोजी राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाकडून केले जात आहे, अशी माहिती ज्येष्ठ दिवाणी न्यायाधीश संदीप पाटील यांनी दिली. शुक्रवारी बेळगावात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. लोकअदालतमध्ये पक्षकार जुन्या प्रकरणांमध्ये द्वेष ठेवून ती पुढे नेत असतात. अशा पक्षकारांना एकत्र आणून दोघांचीही समजूत काढून प्रकरणे निकाली काढण्याचा प्रयत्न केला जाईल, असे त्यांनी सांगितले. लोकअदालतमुळे नागरिकांना शांततापूर्ण जीवन जगता येते. पक्षकारांचा वेळ आणि पैसा वाचेल, अशा पद्धतीने आम्ही काम करतो. प्रत्येक व्यक्तीला कायद्याची माहिती देणे हे आमचे उद्दिष्ट आहे. बेळगाव जिल्ह्यात कायमस्वरूपी लोकअदालत उपलब्ध आहेत. जिल्हा न्यायाधीश ती प्रकरणे हाताळत आहेत. तिथेही पक्षकार हजर राहून आपली प्रकरणे निकाली काढू शकतात, असेही पाटील यांनी नमूद केले.

लोकअदालतमध्ये त्वरित न्याय मिळतो आणि कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही. फौजदारी आणि ४२० कलमाखालील प्रकरणे लोकअदालतमध्ये येतात. वादाच्या प्रकरणांमध्ये परस्पर सामंजस्य घडवून आणल्यास त्यांनाही न्याय मिळवून देता येतो, असेही त्यांनी स्पष्ट केले. १,३७,७४६ प्रलंबित प्रकरणांपैकी १२,००० प्रकरणे सामंजस्याने मिटण्यास तयार आहेत. अजूनही अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत. यासाठी लोकांमध्ये जनजागृती करण्याची गरज असल्याचे पाटील यांनी सांगितले.


Recent Comments