मुसळधार पावसामुळे राष्ट्रीय महामार्गाच्या सेवा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याची घटना बेळगाव जिल्ह्यातील निपाणी तालुक्यातील सौंदलगा गावाजवळ घडली आहे. सौंदलगा गावाला लागून असलेल्या पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गाच्या सेवा रस्त्यालगतच्या ओढ्यातून मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने ते थेट सर्व्हिस रोडवर शिरले.

ओढा दुथडी भरून वाहिल्याने गावातील रस्तेही ओढ्यासारखेच भासू लागले आहेत. राष्ट्रीय महामार्गाच्या सेवा रस्त्यावर पाणी आल्याने वाहनचालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.
Recent Comments