अनगोळ मधील संत मीरा शाळेत ३ ते ८ वयोगटातील मुलांसाठी अक्षरारंभ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.हिंदू संस्कृती आणि शास्त्रानुसार मुलांसाठी अक्षरारंभ हा एक महत्त्वाचा संस्कार मानला जातो. शास्त्रानुसार, मुलांना पाचव्या वर्षी अक्षरारंभ संस्कार करावा. परंपरेनुसार शुभ मुहूर्तावर अक्षरारंभ केलेल्या मुलांमध्ये पुढे चांगले संस्कार रुजतात आणि ती विद्यापारंगत होतात, अशी धारणा आहे. यानुसार आयोजित या सोहळ्यात १५० मुलांनी आपल्या पालकांसोबत उत्साहाने भाग घेतला. संतोष जोशी यांनी अक्षरारंभ आणि सरस्वती पूजा विधीनुसार पार पाडली. त्यांनी तांदळावर अक्षरे गिरवून मुलांकडून त्यांच्या मातांच्या हस्ते ती वळवून घेतली. मुलांना औक्षण करून, कपाळाला गंध-टिळा लावून त्यांचे स्वागत करण्यात आले. मुलांनी आपल्या हाताच्या बोटांनी ‘ॐकार’ला गंधाने आकार देऊन आत प्रवेश केला.शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुजाता दप्तरदार, सहमुख्याध्यापिका श्रीमती ऋतुजा जाधव आणि श्रीमती आशा कुलकर्णी माताजी यांच्या हस्ते सरस्वती पूजा करण्यात आली. जर प्रत्येकाच्या घरात शिशुंच्या अक्षरारंभाची ही पद्धत रुजवली गेली, तर ती मुले निश्चितपणे विद्यापारंगत होतील, यात शंका नाही, असे या सोहळ्यादरम्यान सांगण्यात आले.



Recent Comments