Belagavi

बेळगाव ग्रामीणच्या गुणी विद्यार्थ्यांचा होणार सत्कार

Share

एसएसएलसी आणि पीयूसी परीक्षेत ८० टक्क्यांहून अधिक गुण मिळवलेल्या बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील विद्यार्थ्यांचा सत्कार महिला आणि बाल विकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते १५ जून रोजी करण्यात येणार आहे.

हा कार्यक्रम कुवेंपुनगर येथील मंत्र्यांच्या गृह कार्यालयात होणार असून, मंत्री महोदया विद्यार्थ्यांना सन्मानित करून अभिनंदन पत्र देतील.

यावेळी ६०० हून अधिक विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात येणार असून, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देखील वितरित करण्यात येणार आहे. पात्र विद्यार्थ्यांनी आपली गुणपत्रिका सोबत आणावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाला विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी आणि युवा नेते मृणाल हेब्बाळकर उपस्थित राहणार आहेत. अधिक माहितीसाठी बेळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील विद्यार्थ्यांनी ७४०६२०६४७२ या क्रमांकावर संपर्क साधावा.

Tags: