Banglore

आर.सी.बी. विजयोत्सवातील मृत्यू ‘सरकारप्रायोजित खून’; आर. अशोक यांचा गंभीर आरोप

Share

आर.सी.बी. विजयोत्सवाच्या वेळी झालेल्या चेंगराचेंगरीत लोकांना आमंत्रण देऊन बोलावून सरकारनेच त्यांची ‘हत्या’ केली, असे गंभीर आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते आर. अशोक यांनी केले. ‘मृत्यू’ ही काँग्रेस सरकारची सहावी गॅरंटी आहे, असेही ते म्हणाले.

बंगळूरु येथील आर.सी.बी. विजयोत्सवाच्या वेळी झालेल्या चेंगराचेंगरीत ११ जणांच्या मृत्यूच्या घटनेवरून विधानसभेचे विरोधी पक्षनेते आर. अशोक यांनी काँग्रेस सरकारवर तीव्र शब्दांत हल्ला चढवला आहे. ही घटना म्हणजे सरकारप्रायोजित खून असून, ‘मृत्यू ही काँग्रेस सरकारची सहावी गॅरंटी’ असल्याची टीका त्यांनी केली. भाजपच्या निषेध आंदोलनादरम्यान बोलताना, अशोक यांनी सरकारवर दुहेरी धोरणाचा आरोप केला. पोलीस अधिकाऱ्यांनी कार्यक्रमाला परवानगी दिली नसतानाही तो आयोजित केल्यानेच हे बळी गेले,

असा दावा त्यांनी केला. मरण पावलेले लोक केवळ मृतदेह नसून, ते शासनाच्या चुकीमुळे बळी पडलेले ‘शहीद’ आहेत, असेही ते म्हणाले. काँग्रेस सरकार सत्तेत आल्यापासून अधिकारी, शेतकरी, गर्भवती महिला, बालके आणि पोलिसांसह अनेक जणांचा मृत्यू झाल्याचे नमूद करत, एका बाजूला सरकारमधील सदस्य सेल्फी घेत होते तर दुसऱ्या बाजूला लोकांचा जीव जात होता, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

यावेळी खासदार गोविंद कारजोळ, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते छलवादी नारायणस्वामी, एमएलसी सी.टी. रवि आदींसह भाजपचे अनेक नेते उपस्थित होते.

Tags: