Belagavi

‘म्हादई’ वादात नकळत सहभागी; हुक्केरी स्वामीजींनी व्यक्त केला खेद

Share

हुक्केरी हिरेमठाचे चंद्रशेखर शिवाचार्य स्वामीजी यांनी नुकत्याच बेळगावात झालेल्या म्हादई विरोधी आंदोलनात योग्य माहिती नसताना सहभागी झाल्याबद्दल खेद व्यक्त केला आहे.

या संदर्भात प्रसारमाध्यमांना स्पष्टीकरण देताना स्वामीजी म्हणाले की, काही आयोजक आमच्याकडे आले आणि त्यांनी पर्यावरण संरक्षणासाठी रॅली आयोजित केली असल्याचे सांगितले. सर्व समाजातील स्वामीजींना आमंत्रित केले असल्याचे सांगत त्यांनी आम्हाला सहभागी होण्यास सांगितले. पर्यावरणाचे रक्षण करणे ही आमची पहिली प्राथमिकता आहे असे वाटल्याने, मी एक क्षणही विचार न करता त्या रॅलीत सहभागी झालो. मात्र, रॅलीत सहभागी झाल्यावर मला कळले की, ती रॅली म्हादई आंदोलनाच्या विरोधात होती.

मी स्वतः भूमी, भाषा आणि पाण्याच्या मुद्द्यांवर संघर्ष करणारा असल्याने आणि म्हादई आंदोलनाच्या बाजूने असल्याने, मला खरी परिस्थिती कळताच मी लगेच तेथून निघून आलो. आयोजकांनी आमची दिशाभूल केली होती. मी योग्य विचार न करता तिथे जायला नको होते, याबद्दल आम्हाला असमाधान असून, त्यासाठी आम्ही खेद व्यक्त करतो, असेही स्वामीजींनी म्हटले आहे.

Tags: