यंदा मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली असून पावसाळ्याला सुरुवात होण्यापूर्वीच हस्त नक्षत्राच्या मुहूर्तावर बेळगाव तालुक्यातल्या हलगा गावाच्या परिसरात शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पेरणीसाठी जमिनीची मशागत सुरू केली आहे.


यावर्षी वेळेपूर्वीच सर्वत्र जोरदार पाऊस झाल्याने तलाव आणि नद्या भरून वाहत आहेत. यामुळे शेतकरी आनंदी झाले असून, सर्वत्र कृषी कामांना वेग आला आहे. शेतकरी आता खरीप हंगामासाठी शेतीची मशागत करण्यास सुरुवात करत असून बेळगाव तालुक्यातल्या हलगा परिसरातही शेतकरी पेरणीसाठी ट्रॅक्टरने नांगरणी करून जमिनीची मशागत करत आहेत. काही ठिकाणी शेतकरी जुनी पारंपरिक पद्धत वापरत असून, काही ठिकाणी यांत्रिकीकरणाचा वापर करून मशागतीची कामे पूर्ण केली जात आहेत.


Recent Comments