श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान बेळगाव च्या वतीने धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांची हिंदु तिथीनुसार (जेष्ठ शु.द्वादशी जयंती) साजरी करण्यात आली. यानिमित्त धर्मवीर संभाजी महाराज चौक येथिल श्री शंभूतीर्थ येथे धर्मवीर श्री संभाजी महाराजांच्या मूर्तीचे विधिवत पूजन करण्यात आले. प्रारंभी प्रेरणा मंत्राने सुरुवात करून संभाजी महाराजांच्या मूर्तीला जलाभिषेक व दुग्धाभिषेक घालण्यात आला. यावेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान बेळगावचे जिल्हाप्रमुख श्री विश्वनाथ पाटील व शहर प्रमुख अनंत चौगुले यांच्या हस्ते पुष्पहार घालून पूजन करण्यात आले.

त्यानंतर संभाजी महाराजांची आरती करून, श्लोक म्हणून ध्येय मंत्राने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यावेळी कर्नाटक प्रांत प्रमुख किरण गावडे यांनी उपस्थित धारकऱ्यांना मार्गदर्शन केले. तसेच सोमवार दि.. 9जून रोजी ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा संपन्न होणार आहे व तसेच संध्याकाळी चार वाजता देवदर्शन यात्रा काढण्यात येणार आहे या दोन्ही कार्यक्रमास सर्व हिंदू बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन यावेळी करण्यात आले. यावेळी पूजेचे पौरोहित्य प्रथमेश हुरकडली यांनी केले.
यावेळी तालुका प्रमुख परशराम कोकितकर,विभाग प्रमुख किरण बडवानाचे, प्रमोद चौगुले,शिवाजी मंडोळकर, गजानन पवार, गजानन निलजकर, अमोल केसरकर, राम सुतार, सागर कडोलकर, अमित लगाडे, अतुल केसरकर, प्रफुल्ल शिरवळकर,विजय कुंटे,दिगंबर कातकर, गजानन पाटील,संतोष कुसाने, अजित बांदेकर,सुनील मुरकुटे,ओमकार तलवार, ओम काकडे, जोतिबा चोपडे,धीरज इसराणी,मारुती पाटील,संकेत सुतार,प्रमोद कांग्राळकर, तसेच सुलोचना शिंदोळकर, विद्या पाटील व अनेक शिवभक्त आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते..


Recent Comments