बेळगावात आज श्री अम्मा भगवान यांचा ‘कल्याण महोत्सव’ अत्यंत श्रद्धेने आणि भक्तिभावाने साजरा झाला.

बेळगावच्या सदाशिवनगरमधील श्री परमज्योती अम्मा भगवान ध्यान मंदिरात हा महोत्सव आयोजित करण्यात आला होता. कल्याण महोत्सवानिमित्त शहरात मंगलवाद्यांच्या गजरात पादुकांची मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर ध्यान मंदिरात अम्मा भगवान यांचा कल्याण महोत्सव भक्तीभावाने पार पडला.

यावेळी अम्मा भगवान यांच्या शिष्या मिहिरा दासजी यांनी सांगितले की, ९ जून रोजी सर्वत्र श्री अम्मा भगवान यांचा कल्याण महोत्सव साजरा केला जात आहे. हा महोत्सव लोककल्याणासाठी आयोजित केला जातो. अम्मा भगवान यांच्या कृपेसाठी चांगले नातेसंबंध आवश्यक आहेत, असेही त्यांनी नमूद केले.

या सोहळ्याला शेकडो भक्तांनी हजेरी लावली आणि त्यानंतर अनेकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.


Recent Comments