Belagavi

प्रभाग क्रमांक ३३मध्ये पर्यावरण दिन साजरा

Share

बेकगावच्या प्रभाग क्रमांक ३३ मध्ये नगरसेविका रेशमा पाटील यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पर्यावरण दिन साजरा करण्यात आला.

प्रभाग क्रमांक ३३ मधील केएसआरपी प्रशिक्षण शाळा, एपीएमसी मार्केट आणि मेघा गॅसचे मुख्य कार्यालय या ठिकाणी वृक्षारोपण कार्यक्रम पार पडले. या उपक्रमातून पर्यावरणाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले आणि निसर्ग संवर्धनाचा संदेश देण्यात आला.

माजी उपमहापौर रेश्मा प्रवीण पाटील, सामाजिक कार्यकर्ते प्रवीण पाटील, भाजप नेते मुरुगेन्द्रगौडा पाटील आणि भाजपचे उपाध्यक्ष संतोष बोरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी प्राचार्य के. एम. महादेव प्रसाद, उपप्राचार्य ए. बी. मेघण्णावर, निरीक्षक दयानंद राड्यारट्टी (एफसीआय), प्रमोद कारेण्णावर, मेघा गॅसचे व्यवस्थापक सुशांत जीवणगौडर आणि सहयोगी व्यवस्थापक मयूर हिरेमठ यांच्यासह मेघा गॅसचे कर्मचारी उपस्थित होते.

Tags: