Banglore

आरसीबीच्या विजयाचा कर्नाटकाला अभिमान : उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार

Share

आरसीबी संघाने आयपीएलमध्ये कर्नाटकला अभिमान आणि गौरव मिळवून दिला असून, सरकारच्या वतीने सत्कार समारंभ आयोजित करण्याची तयारी सुरू असल्याची माहिती उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी दिली.

आज बंगळूरुमध्ये बोलताना ते म्हणाले, आरसीबी संघाने कर्नाटकला अभिमान आणि गौरव मिळवून दिला आहे. आम्ही देखील संपूर्ण सामना पाहिला. आज हा संघ बंगळूरुला येणार आहे. त्याचे भव्य स्वागत आणि सत्कार करण्याबाबत चर्चा झाली आहे. लोकांना वाहतुकीचा त्रास होऊ नये यासाठी गृहमंत्री आणि पोलीस आयुक्तांशी चर्चा करणार आहोत. या दिशेने पूर्वतयारी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

Tags: