कर्नाटक सरकारच्या दोन वर्षांच्या कार्यकाळ पूर्णत्वाचा भाग म्हणून ‘साधना संभ्रम’अंतर्गत राज्य सरकारच्या विकासकामांची माहिती देणाऱ्या प्रदर्शन दालनाचे बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी आज बेळगावातील केंद्रीय बसस्थानकात लोकार्पण केले.


यावेळी ‘इन न्यूज’शी बोलताना ते म्हणाले की, सरकारच्या गॅरंटी योजनांमुळे लोकांना किती फायदा झाला आणि गॅरंटी योजनांची कामगिरी जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी राज्यात ९ ठिकाणी प्रदर्शन दालने सुरू करण्यात आली आहेत. यात बेळगावचाही समावेश आहे. आगामी काळात विभागवार सरकारी कामगिरीची माहिती देण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी उत्तरचे आमदार आसिफ सेठ, माहिती आणि सार्वजनिक संबंध विभागाचे उपसंचालक गुरुनाथ कडबूर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.


Recent Comments