Belagavi

बेळगावात उपनिबंधक कार्यालयाला सुट्टी नाही

Share

‘नो सुट्टी, फुल ड्युटी’ असे नवे धोरण उपनिबंधक कार्यालयाने स्वीकारले असून आता बेळगावचे उपनिबंधक कार्यालय दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी तसेच रविवारच्या सुट्ट्यांमध्येही कार्यरत राहणार आहे.

नोंदणी आणि मुद्रांक विभागाने ‘एनीवेअर रजिस्ट्रेशन’ प्रणाली यापूर्वीच सुरू केली असल्यामुळे, जिल्ह्यातील उपनिबंधक कार्यालये दुसरे आणि चौथे शनिवार तसेच रविवारच्या सुट्टीच्या दिवशीही सुरू ठेवण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. सुट्टीच्या दिवशी सुरू असलेल्या या कार्यालयात जिल्ह्यातील कोणतीही मालमत्ता नोंदवता येणार आहे. जिल्हा निबंधक अधिकाऱ्यांनी नागरिकांना या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

Tags: