नवीन शैक्षणिक वर्षाचा प्रारंभोत्सव नगरसेवक श्री नितीन जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डायट मन्नूर चे सीनियर लेक्चरर श्री यू.डी.हुनकुप्पी सर उपस्थित होते.

यावेळी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांचे गुलाब देऊन स्वागत करण्यात आले. तसेच सर्व विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके तसेच दोन जोड कपडे वाटप करण्यात आले. यावेळी बोलताना श्री नितीन जाधव सर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व समजावून दिले तसेच सरकारी शाळेत मिळणाऱ्या सोयी समजावून दिल्या श्री यू.डी. हुनकुप्पी सर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या समयी शाळा तोरण बांधून सजवण्यात आली होती. शाळेत विद्यार्थ्यासोबत शाळेची शाळा सुधारणा कमिटी अध्यक्ष व सदस्य उपस्थित होते. उपस्थित सर्व मान्यवरांचे मुख्याध्यापक श्री आर डी बचनट्टी सर यांनी स्वागत केले तसेच सूत्रसंचालन श्रीमती एस पी मोडक यांनी केले.
हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी श्री सी ए डायस सर तसेच एस.डी.एम.सी यांनी विशेष परिश्रम घेतले.


Recent Comments