Dharwad

धारवाडमध्ये ख्रिश्चन निवासी शाळांच्या कर्मचाऱ्यांचे आंदोलन

Share

ख्रिश्चन निवासी शाळांमधील कर्मचाऱ्यांनाही नवोदय निवासी शाळांच्या धर्तीवर १० टक्के विशेष भत्ता मिळावा, या मागणीसाठी आज धारवाडमध्ये ख्रिश्चन निवासी शाळांच्या कर्मचाऱ्यांनी आंदोलन करत आपला संताप व्यक्त केला.

धारवाड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कर्मचाऱ्यांनी सरकारविरोधात निदर्शने केली. ख्रिश्चन निवासी शाळांमधील कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांच्या समस्यांकडे सरकारने लक्ष द्यावे, अशी मागणी आंदोलकांनी केली. प्राचार्य, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पुरेशा सोयीसुविधा मिळत नाहीत. कर्मचाऱ्यांसाठी सर्व प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात, ‘ज्योती संजीवनी योजना’ लागू करावी आणि घरभाडे भत्त्यातील कपात रद्द करावी, अशा मागण्या ख्रिश्चन निवासी शाळांमधील कर्मचाऱ्यांनी केल्या.

Tags: