Vijayapura

अभिनेते कमल हसन आणि रम्या विरोधात कर्नाटक रक्षण वेदिकेचे आंदोलन

Share

कन्नड भाषेबद्दल अपमानकारक वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ अभिनेते कमल हसन आणि अभिनेत्री रम्या यांच्या विरोधात आज विजयपूर जिल्ह्यातील बसवन बागेवाडी येथे कर्नाटक रक्षण वेदिकेतर्फे जोरदार निदर्शने करण्यात आली.

करवेचे राज्य संघटना सचिव आणि हुबळी – धारवाड जिल्ह्यांचे प्रभारी अशोक हारिवाळ यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. बसवन बागेवाडी येथील बसवेश्वर चौकात जमलेल्या करवे कार्यकर्त्यांनी अभिनेते कमल हसन आणि अभिनेत्री रम्या यांच्या विरोधात घोषणाबाजी करत, त्यांच्या छायाचित्रांना चपलाने मारून आपला संताप व्यक्त केला.

विजयपूर शहरातही या विरोधात निदर्शने करण्यात आली. कन्नड भाषेचा अपमान केल्याबद्दल कमल हसन यांनी त्वरित माफी मागावी, अशी मागणी करत विजयपूरच्या डॉ. बी.आर. आंबेडकर चौकात कर्नाटक रक्षण वेदिकेच्या स्वाभिमानी गटाने आंदोलन केले. कन्नडचा अपमान करणाऱ्या कमल हसन यांनी तात्काळ माफी मागावी, अन्यथा त्यांना कन्नड चित्रपटसृष्टीतून तत्काळ बहिष्कृत करावे, अशी मागणी आंदोलकांनी केली. कन्नडचा अपमान म्हणजे सहा कोटी जनतेचा अपमान आहे, असेही आंदोलकांनी नमूद केले.

Tags: