खाटीक समाजाला अनुसूचित जाती प्रवर्गात समाविष्ट करावं, अशी मागणी खाटीक समाजाच्या आरक्षण कार्यकर्त्यांनी मंत्री सतीश जारकीहोळी यांच्याकडे केली आहे. समाजाच्या विकासासाठी सहकार्य करण्याचं आवाहनही यावेळी करण्यात आलं.

कर्नाटक खाटीक समाजाच्या आरक्षण कार्यकर्त्यांनी बेंगळुरू येथील सतीश जारकीहोळी यांच्या शासकीय निवासस्थानी त्यांची भेट घेतली. खाटीक समाजाला अनुसूचित जातीच्या यादीत समाविष्ट करण्यासाठी योग्य ती पावले उचलावीत आणि सरकारला याबाबत समजावून सांगावं, अशी विनंती कार्यकर्त्यांनी केली.

उत्तर भारतातील १० राज्यांमध्ये खाटीक समाजाचा समावेश अनुसूचित जातीत करण्यात आला आहे. मात्र, कर्नाटकात सरकारने समाजशास्त्रीय अभ्यास करून अहवाल मागवला असला तरी, त्याची अंमलबजावणी झालेली नाही. कर्नाटकातील ७ कोटी लोकसंख्येपैकी खाटीक समाज ९७,००० इतका आहे. शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या हा समाज खूपच मागासलेला आहे. त्यामुळे, खाटीक समाजाला योग्य न्याय मिळावा, असं आरक्षण लढ्याच्या राज्य समन्वय समितीच्या सदस्यांनी मंत्र्यांना सादर केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.


Recent Comments