कर्नाटक मराठा समाजाच्या प्रमुख नेत्यांनी नुकतीच विधान परिषद सदस्य एम.जी. मुळे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी दावणगेरे जिल्ह्यातील चन्नगिरी तालुक्यातील होदिगेरे येथे असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजी महाराज यांच्या समाधीच्या विकासावर चर्चा केली.

या भेटीदरम्यान, बेळगावचे प्रसिद्ध साहित्यिक आणि इतिहास संशोधक डॉ. सर्जू काटकर उपस्थित होते. माजी महापौर मालोजीराव अष्टेकर यांनी डॉ. काटकर लिखित ‘द ग्रेट मराठा शिवाजी’ हे पुस्तक आमदार एम.जी. मुळे यांना भेट दिले.

यावेळी प्राचार्य आनंद आपटेकर, जनसंपर्क विकास कलघटगी, तसेच सकल मराठा समाजाचे पदाधिकारी विजय कदम, लक्ष्मण किल्लेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. मराठा समाजाने शहाजी महाराजांच्या समाधी स्थळाचे योग्य प्रकारे संवर्धन आणि विकास करण्याची मागणी एम.एल.सी. मुळे यांच्याकडे केली.


Recent Comments