Gokak

अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत गोकाक रोड रेल्वे स्थानकाचे उद्घाटन

Share

‘अमृत भारत स्टेशन’ योजनेअंतर्गत नूतनीकरण करण्यात आलेल्या गोकाक रोड रेल्वे स्थानकाचे उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे करण्यात आले.

बेळगाव जिल्ह्यातील गोकाक तालुक्याच्या कोन्नूर येथे आयोजित मुख्य कार्यक्रमात राज्यसभा सदस्य श्री. इरन्ना कडाडी यांची विशेष उपस्थिती होती.

यावेळी सभेला संबोधित करताना खासदार कडाडी यांनी गोकाकला जिल्ह्याचा दर्जा मिळवण्याबाबत महत्त्वाचे विधान केले. ते म्हणाले, “यावेळी कोणीही कितीही प्रयत्न केले तरी गोकाक जिल्हा होणारच, यासाठी मला तुम्हा सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे. पुढे बोलताना त्यांनी नमूद केले की, गोकाक जिल्हा यापूर्वीच व्हायला हवा होता, परंतु काही कारणास्तव ते शक्य झाले नाही. मात्र, यावेळेस कोणतीही अडचण आली तरी गोकाक निश्चितपणे जिल्हा होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

‘अमृत भारत स्टेशन’ योजनेअंतर्गत देशभरातील अनेक रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण केले जात आहे. प्रवाशांना उत्तम सुविधा पुरवणे, स्थानकांचे सौंदर्य वाढवणे आणि शहराशी अधिक सुसंगत दळणवळण व्यवस्था विकसित करणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. गोकाक रोड रेल्वे स्थानकाच्या या पुनर्विकासाने येथील प्रवाशांना आधुनिक सुविधांचा लाभ मिळणार असून, परिसराच्या विकासालाही गती मिळणार आहे.

Tags: