एखाद्या सिनेमाच्या कथेला लाजवेल अशी एक प्रेम कहाणी बेळगावमध्ये समोर आली आहे. गेल्या सहा वर्षांपासून एकमेकांवर प्रेम करणाऱ्या आणि महिनाभरापूर्वीच विवाह केलेल्या एका जोडप्याने गुरुवारी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर हजेरी लावून, मुलीच्या कुटुंबियांकडून जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचा आरोप करत संरक्षणाची मागणी केली.

श्वेता पुजारी (मूळजी मुडलगी तालुका) आणि सिद्धप्पा डवळेश्वर यांनी महिनाभरापूर्वी प्रेमविवाह केला आहे. मात्र, श्वेताच्या कुटुंबियांना हा विवाह मान्य नाही. सिद्धप्पाने दिलेल्या माहितीनुसार, श्वेताच्या घरच्यांनी आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केले आहेत. जर मी त्यांच्या हाती लागलो, तर ते मला जीवे मारतील अशी धमकी दिली आहे.
यावेळी श्वेतानेही आपली बाजू मांडली. ती म्हणाली, मी घरात लग्नासाठी अनेक वेळा सांगितले, पण त्यांनी माझा विरोध केला. सिद्धप्पाने मला मोबाईलवर मेसेज करून प्रेम करण्यास सुरुवात केली होती आणि हळूहळू आमचे प्रेम वाढले, ज्याचे रूपांतर आता विवाहात झाले आहे.

या प्रेमविवाहानंतर जोडप्याला मुलीच्या कुटुंबियांकडून मोठ्या धमक्या येत असल्याने त्यांनी धास्ती घेतली आहे. त्यामुळे, आपल्या जीविताला धोका असल्याची भीती व्यक्त करत त्यांनी पोलीस अधीक्षकांकडे संरक्षणाची विनंती केली आहे. पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत.


Recent Comments