मान्सून सुरू होण्यापूर्वीच शहरातील नाल्यांची दुरुस्ती आणि स्वच्छतेची कामे तातडीने पूर्ण करावीत, असे निर्देश बेळगाव महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम स्थायी समितीचे अध्यक्ष जयतीर्थ सवदत्ती यांनी दिले आहेत.

बुधवारी बेळगाव महापालिकेच्या सभागृहात झालेल्या सार्वजनिक बांधकाम समितीच्या बैठकीत ते बोलत होते.
सवदत्ती यांनी नमूद केले की, शहरात पाऊस पडल्यास नाल्यांमध्ये पाणी साचते आणि ते सखल भागांमध्ये शिरून घरांमध्ये पाणी शिरण्याची समस्या निर्माण होते. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ नाल्यांमधील गाळ काढून योग्य ती स्वच्छता करावी आणि दुरुस्तीची कामे हाती घ्यावीत, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

या बैठकीला महापौर मंगेश पवार, उपमहापौर वाणी जोशी, सत्ताधारी पक्षाचे नेते हनुमंत कोंगाळी यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. मान्सूनपूर्व कामांना गती देऊन शहरवासीयांना पावसाळ्यात कोणत्याही प्रकारच्या त्रासाला सामोरे जावे लागू नये, यावर बैठकीत भर देण्यात आला.


Recent Comments