Belagavi

‘चाळोबा गणेश’ आक्रमक, कारचा चुराडा

Share

नुकसान केले आहे. यामुळे परिसरात दहशत निर्माण झाली आहे. बेकिनकेरे-उचगाव मार्गावर गावाशेजारी डॉ. निरंजन कदम यांचे निवासस्थान आहे. त्यांच्या घरी गोवा मडगाव येथून सचिन पाटील (मूळगाव निट्टर, ता. चंदगड) हे आपल्या पत्नीला घेऊन जाण्यासाठी आले होते. शुक्रवारी रात्री साडेआठ वाजता त्यांनी घरासमोर कार पार्क केली होती. मध्यरात्री सुमारे दीडच्या सुमारास चाळोबा गणेश हत्तीने या कारचा चेंदामेंदा केला. कार पूर्णपणे स्क्रॅप झाली आहे. हत्तीने पायाने दाबून कार चेपवली आहे.

तसेच सुळे मारूनही नुकसान केले आहे. तसेच जवळ असलेल्या संभाजी कदम यांच्यासह किरण कदम यांच्या दोन पाण्याच्या प्लास्टिक टाक्या फोडून टाकल्या. या हत्तीने जवळचे असलेल्या उसाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. सदर अति आता अधिक आक्रमक झाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहे. नागरी वसतीमध्ये येऊन हल्ला करत आहे. चाळोबा गणेशचे आगमन होण्यापूर्वी ओमकार नावाच्या हत्तीनेही बेळगाव तालुक्याच्या धामणे परिसरात धुमाकूळ घातला होता.

तो सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग येथे गेला आहे. ओमकार हत्तीच्या हल्ल्यात काजू वेचणाऱ्या शेतकऱ्याचा महिनाभरापूर्वी बळी गेला आहे. हत्तीची दहशत वाढल्याने वनखात्याने त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी करण्यात येत आहे.

Tags: