काही दिवसांपूर्वीच निवृत्त झालेले एएसआय एस. एन. पाटील यांचे शुक्रवारी आजारपणामुळे निधन झाले.

बेळगावातील वीरभद्रेश्वर नगरचे रहिवासी आणि मूळचे चचडी गावचे असलेले पाटील यांनी मार्केट पोलीस ठाण्यासह शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये सेवा बजावली होती. पाटील हे काही दिवसांपासून आजारी होते. त्यांचे त्यांच्या मूळ गावी चचडी येथे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी आणि मोठा आप्तपरिवार आहे.
Recent Comments