धारवाड जिल्ह्यातील नवलगुंद शहराच्या बायपास रस्त्याच्या निर्मितीसाठी यापूर्वीच केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्यानुसार आता या कामाला परवानगी मिळाली आहे, अशी माहिती केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिली आहे.

याबाबत सोशल मीडियावर माहिती देताना केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले, या बायपास संदर्भात सादर केलेल्या जोडणी आणि तपशीलवार प्रकल्प अहवालाला मंत्रालयाच्या उच्च समितीने मान्यता दिली आहे. नवलगुंद शहरासाठी १०.५७५ किलोमीटर लांबीचा बायपास रस्ता तयार होणार आहे. बेण्णेहळ्ळी आणि तिला मिळणाऱ्या लहान नाल्यांमुळे पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होत होती. त्यामुळे शेतीत पिकांचे नुकसान होत होते आणि अनेक ठिकाणी संपर्क तुटत होता. यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी बायपास बनवण्याचा प्रयत्न सुरू होता.


Recent Comments