Belagavi

सफाई कर्मचाऱ्यांचा सरकार विरोधात एल्गार!

Share

पंचायत राज विभागातील सफाई कर्मचाऱ्यांना निमसरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा दिल्यानंतरही, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील कर्मचाऱ्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या सरकार विरोधात सफाई कर्मचाऱ्यांनी एल्गार पुकारला आहे.

जर सरकारने २६ मे पर्यंत या कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत, तर २७ मे पासून काम बंद करून आंदोलन करण्याचा इशारा कर्नाटक राज्य पौर कर्मचारी संघटनेने दिला आहे. या मागणीसाठी आज कर्नाटक राज्य पौर कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.

पंचायत राज विभागातील कर्मचाऱ्यांना निमसरकारी दर्जा देऊन, शहर स्तरावरील कर्मचाऱ्यांशी दुजाभाव केला जात आहे. शहर स्थानिक संस्थांमधील कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा, तसेच कंत्राटी पद्धत रद्द करून थेट वेतन द्यावे, आणि दैनिक वेतन भोगणाऱ्या कर्मचाऱ्यांना कायम करावे, यांसारख्या विविध मागण्यांसाठी २६ मे पर्यंत सरकारला अंतिम मुदत देण्यात आली आहे. मागण्या पूर्ण न झाल्यास संपावर जाण्याचा इशारा बसवराज कांबळे यांनी दिला.

या संदर्भातील निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सरकारला सादर करण्यात आले. या वेळी दुंडप्पा रंगण्णावर, सुखदेव शिंदे, यशवंत सण्णक्की, विवेक बन्नई, श्रीधर पाटील, मारुती बल्लारी, महेश भजंत्री, प्रवीण गरदाळे यांच्यासह अनेक कर्मचारी उपस्थित होते.

Tags: