बेळगाव टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचे २०२५-२०२८ या कालावधीसाठी निवडून आलेले अध्यक्ष श्री. संजीव बडगंडी यांच्या नेतृत्वाखालील नवीन टीमचा पदग्रहण समारंभ १३ मे २०२४ रोजी होणार आहे.


हा कार्यक्रम सकाळी १०.३० वाजता बेळगाव शहरातील तिसऱ्या रेल्वे गेटजवळील सॅंटोरिनी हॉटेलमध्ये होणार आहे.या समारंभाचे प्रमुख पाहुणे केएसटीपीएचे अध्यक्ष श्री. एन. प्रसाद तर केएसटीपीएचे सचिव श्री. मुकुंद पोटनीस, बीसीसीआय बेळगावचे अध्यक्ष श्री. संजू कत्तीशेट्टी आणि बीसीसीआयचे सचिव राजेंद्र मुतगेकर हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.टी.एन.मलगे, विक्रम कोकणे, सचिन कुलकर्णी, शशी बडकर, सोमशेकर सुतार आणि टीमच्या सदस्यांनी सर्वांना कार्यक्रमाचे हार्दिक निमंत्रण दिले आहे.


Recent Comments