लोक कल्याणासाठी १२ ते १४ मे दरम्यान पारिशवाड येथील सुवर्णधाम मठात शतचंडी यज्ञ आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती सुवर्णधाम मठाचे श्री सद्गुरू परवडेश्वर महाराज यांनी दिली.

रविवारी बेळगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेला संबोधित करताना ते बोलत होते. ते म्हणाले की, उत्तर कर्नाटकात पारिशवाड येथील सुवर्णधाम मठात आपण पारंपरिक पद्धतीने शतचंडी यज्ञ करत आलो आहोत. आपला मठ गरीब लोकांसाठी काम करतो. जनसेवा करणे हे आपल्या मठाचे मुख्य उद्दिष्ट आहे. गरिबांचे दुःख दूर करून त्यांच्या चेहऱ्यावर सुख आणि शांती पाहू इच्छितो, असे त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, या शतचंडी यज्ञात सहभागी होण्यासाठी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक उपस्थित राहणार आहेत. तीन दिवस चालणाऱ्या या शतचंडी यज्ञामध्ये विविध मठांचे मठाधीश आणि हजारो भक्त सहभागी होणार आहेत.


Recent Comments