Belagavi

मृत्यूतही सार्थकता…

Share

मूळचे चिक्कोडी येथील रहिवासी आणि सध्या बेळगावातील शहापूर कचेरी गल्ली येथील रहिवासी व्यंकटेश रामचंद्र कुलकर्णी उर्फ भाऊसाहेब करगांवकर (९०) यांचे आज निधन झाले. त्यांच्या अंतिम इच्छेनुसार मरणोत्तर देहदान करण्यात आले.

मृतांच्या अंतिम इच्छेनुसार, बैलहोंगल येथील डॉ .रामण्णवर चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून बेळगाव येथील जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेजला देहदान करण्यात आले. रामण्णवर चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव डॉ. महांतेश रामण्णावर यांनी पार्थिव दान केल्याबद्दल कुलकर्णी कुटुंबाचे आभार मानले. मृतकाच्या पश्चात पत्नी, मुलगा, तीन मुली व मोठा परिवार आहे.

Tags: