Belagavi

सुट्टीसाठी आलेल्या युवतीची आत्महत्या

Share

सुट्टीसाठी बेळगावला आलेल्या ऐश्वर्या नावाच्या युवतीने बेळगाव शहराच्या बाहेरील होनगा येथे आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. निपाणी येथील राहुल नावाच्या व्यक्तीच्या फोन कॉलनंतर ऐश्वर्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केला आहे.

याबाबत माहिती देताना ऐश्वर्याचे वडील शिवाजी यांनी शनिवारी एका खाजगी रुग्णालयात पत्रकारांशी संवाद साधला. शाळेला सुट्टी असल्याने माझ्या बहिणीच्या आग्रहास्तव मी ऐश्वर्याला येथे पाठवले होते, असे त्यांनी सांगितले. मात्र, निपाणी येथील राहुलने ऐश्वर्याला फोन केल्यामुळे तिने आत्महत्या केली असावी असा संशय त्यांनी व्यक्त केला. या प्रकरणाची सत्यता समोर आणण्यासाठी ऐश्वर्या आणि राहुल यांच्या मोबाईलची सखोल चौकशी करण्याची मागणी वडिलांनी केली आहे.

ऐश्वर्याचे शवविच्छेदन खाजगी रुग्णालयात करण्यात आले असून, ही घटना काकती पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Tags: