Belagavi

महासाध्वी हेमरेड्डी मल्लम्मा जयंतीनिमित्त शहरात भव्य शोभायात्रा

Share

बेळगाव जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, महानगरपालिका आणि कन्नड आणि संस्कृती विभागाच्या वतीने आज महासाध्वी हेम रेड्डी मल्लम्मा यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त शहरात शनिवारी सायंकाळी भव्य शोभायात्रा काढण्यात आली.

बेळगावमध्ये महासाध्वी हेमरेड्डी मल्लम्मा जयंती सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. महापौर मंगेश पवार, उपमहापौर वाणी जोशी, बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे, कन्नड आणि संस्कृती विभागाच्या उपसंचालक विद्यावती भजंत्री, समाचे प्रमुख रामण्णा मुल्लूर, शंकर अरकेरी यांच्यासह अन्य मान्यवरांनी ढोल वाजवून शोभायात्रेला प्रारंभ केला.

जिल्हाधिकारी कार्यालयापासून सुरू झालेली ही शोभायात्रा कोर्ट रोड, आर.टी.ओ. संगोळी रायण्णा सर्कल, एसपी ऑफिस रोड मार्गे कुमार गंधर्व कलामंदिर येथे पोहोचली. या मिरवणुकीनंतर समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या शोभायात्रेत समाजातील बांधव, अधिकारी आणि इतर नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Tags: