बेळगावच्या शैक्षणिक क्षेत्रात आपल्या दर्जेदार शिक्षणामुळे नावलौकिक मिळवलेल्या ‘विविड मॉंटेसरी अँड प्रायमरी स्कुल’ने यशाची आणखी एक भरारी घेत आपली दुसरी शाखा सुरू केली आहे. बेळगावच्या बालकांना इंग्रजी माध्यमातील उत्कृष्ट शिक्षण आणि त्यांच्यातील कलागुणांना वाव देण्यासाठी कार्यरत असलेल्या या शाळेने आता बेळगाव तालुक्यातील बाळेकुंद्री के.एच. गावात आपला विस्तार केला आहे.


आज शाळेच्या संस्थापिका आणि चेअरमन श्रीमती रोहिना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली नवीन शाखेचा उद्घाटन समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. शाळेच्या संस्थापिका आणि चेअरमन रोहिणा देसाई यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित समारंभात, प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले मेहेंदी शाहरुख जारे, इव्हेंट कॉन्ट्रॅक्टर फत्ते अहमद साबखान आणि तनवीर इनामदार यांच्यासह शाळेचा विद्यार्थी शॅरॉन राजू सिट्टेम याच्या हस्ते दीपप्रज्वलन करून विविड मॉन्टेसरी आणि प्राथमिक शाळेच्या बाळेकुंद्री के.एच. शाखेचे दिमाखात उद्घाटन करण्यात आले, हे या कार्यक्रमाचे लक्षवेधी वैशिष्ट्य ठरले.

यावेळी बोलताना शिक्षिका स्वाती जाधव यांनी सांगितले की, विविड मॉंटेसरी शाळेने शिक्षणासोबतच मुलांना त्यांच्या विविध कला सादर करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. २००४ पासून शाळा शिक्षण क्षेत्रात सक्रिय असून, आता बाळेकुंद्री येथे दुसरी शाखा सुरू झाली आहे. शाळेत अनुभवी शिक्षक शिकवतात आणि येथे अनेक आधुनिक सुविधा उपलब्ध आहेत.

बाळेकुंद्री के.एच. गावात विविड मॉंटेसरी आणि प्राथमिक शाळेची नवीन शाखा सुरू झाल्याबद्दल पालकांनी आनंद व्यक्त केला. पालक फातिमा आणि इतर पालकांनी सांगितले की, मुलांच्या शिकण्यासाठी आणि वाढीसाठी शाळेने खूप चांगले वातावरण निर्माण केले आहे. येथे मुलांना चांगल्या वातावरणासोबतच उच्च दर्जाचे शिक्षण मिळत आहे. शिक्षक आणि कर्मचारी मुलांची खूप चांगली काळजी घेतात.

आजची मुले ही उद्याचे नागरिक आहेत, त्यामुळे त्यांना चांगले शिक्षण मिळणे अत्यंत आवश्यक आहे. ही शाळा मुलांना दर्जेदार शिक्षण देऊन त्यांच्या उज्ज्वल भविष्याचा पाया रचत आहे, असे मत पास्टर विजयकुमार बाळेकुंद्री यांनी व्यक्त केले.

बाळेकुंद्री गावातच विविड मॉंटेसरी सुरू झाल्यामुळे पालकांची सोय झाली आहे. उत्तम गुणवत्ता शिक्षण, विविध ॲक्टिव्हिटीज, शिकवणे, शिक्षक, कर्मचारी सगळे खूप चांगले आहे. लोकांकडूनही या शाळेला चांगला प्रतिसाद मिळत असून, आमच्या मुलांना याच शाळेत दाखल केल्याचे पालक सोनू यांनी सांगितले.
यावेळी विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Recent Comments