Belagavi

साई राम मंदिर सेवा संघातर्फे विद्यार्थ्यांचा सत्कार

Share

बेळगाव खासबाग, राघवेंद्र कॉलनी येथील श्री साई राम मंदिर सेवा संघातर्फे एसएसएलसी आणि पीयूसी परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

श्री साई राम मंदिर सेवा संघातर्फे एसएसएलसी आणि पीयूसी परीक्षेत उच्च गुण मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थी आणि विद्यार्थिनींच्या सत्कार आणि अभिनंदन सोहळ्यात, एसएसएलसी परीक्षेत यश मिळवलेले विद्यार्थी अपेक्षा वेर्णेकर,

 

श्रुती गौडर, तन्वी कालंगडी, रणजीत अनगोळ, तसेच पीयूसीची गुणवंत विद्यार्थिनी नित्या रायकर आणि कराटे स्पर्धेत प्रथम स्थान मिळवलेल्या स्फूर्ती ताळूकर यांचा सत्कार करून त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

मंदिर समितीचे अध्यक्ष मयूर वेर्णेकर यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवले. उपाध्यक्ष विजय नैनार, सचिव श्रीधर तिगडी, विनायक रायकर, खजिनदार श्रीशैल मदली, नीळकंठ शेट्टी आणि सदस्य, तसेच विद्यार्थी, पालक आणि साई मंदिराचे भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: