Belagavi

आताची भारतीय सेना अधिक बळकट; पाकिस्तानातील अतिरेक्यांचे पूर्ण उच्चाटन हवे – माजी जवान प्रकाश पाटील

Share

भारतीय सेना आता पूर्वीपेक्षा अधिक शक्तिशाली झाली असून, पाकिस्तानमधील अतिरेकी आणि त्यांच्या तळांचे संपूर्ण उच्चाटन करणे आवश्यक आहे, असे मत माजी जवान सुभेदार प्रकाश पाटील यांनी व्यक्त केले.

भोजवाडी (निपाणी तालुका) येथील प्रकाश पाटील यांनी इन न्यूज वाहिनीशी बोलताना आपले अनुभव मांडले. 1988 मध्ये एमएलआयआरसी (बेळगाव) द्वारे भारतीय सेनेत भरती झालेले प्रकाश पाटील यांनी जम्मू-काश्मीर, पठाणकोट, गुजरात, सिक्कीम आदी ठिकाणी एकूण 30 वर्ष सेवा दिली आणि 2018 मध्ये सेवानिवृत्त झाले. 2006 मध्ये कुपवाडा येथे अतिरेक्यांनी माझ्यावर 30 गोळ्या झाडल्या. एका हाताचा भाग गमवावा लागला, पण उपचारांनंतर पुन्हा सेनेत रुजू झालो. त्या वेळी सेनेला स्वातंत्र्य आणि संसाधनांची कमतरता होती. आता परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे असे ते म्हणाले.

आजची भारतीय सेना अधिक आधुनिक उपकरणांनी सुसज्ज असून केंद्र सरकारकडून पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आले आहे, असे ते म्हणाले. अतिरेक्यांच्या मुळावर जाऊन कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली.

Tags: