बेळगावमधील सामाजिक संस्था ‘सर्व लोक सेवा संस्था’ला ‘द सर्जिकल शॉपी’ने दोन बेड दान करून मदत केली आहे.

बेळगावमध्ये सर्व लोक सेवा संस्था अनेक सामाजिक उपक्रमांद्वारे लोकांची सेवा करते. या संस्थेच्या कार्याला पाठिंबा देण्यासाठी अनेक संस्था पुढे येत आहेत. आता ‘द सर्जिकल शॉपी’ने दोन बेड दान केले असून या मदतीबद्दल सर्व लोक सेवा संस्थेचे संस्थापक वीरेश हिरेमठ यांनी दात्यांचे आभार मानले.
यावेळी शरद जोशी, बसय्या हिरेमठ, गंगय्या पुजारी, संतोष अकोळे, बसवंत, नागेश शिंदे यांच्यासह ‘द सर्जिकल शॉपी’चे सदस्य उपस्थित होते.


Recent Comments