Belagavi

अपंग कल्याणासाठी संसदीय समितीची बैठक योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी खास.

Share

आज नवी दिल्ली येथे सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण संसदीय स्थायी समितीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत उच्च शिक्षण संस्थांमधील ‘सुगम्य भारत अभियान’च्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला. समितीने अपंग व्यक्तींसाठीच्या सुविधांवर विस्तृत चर्चा केली.

चिकोडीच्या खासदार प्रियांका जारकिहोळी यांनी विविध मंत्रालयांच्या प्रतिनिधींकडून माहिती घेतली. यावेळी खास. जारकीहोळी यांनी मंत्रालयांना अपंग व्यक्तींच्या कल्याणासाठी योजना अधिक प्रभावीपणे राबवण्याचे निर्देश दिले. या बैठकीत विद्यापीठे आणि महाविद्यालयांमधील भौतिक सुविधा: रॅम्प, विशेष शौचालय आणि अपंग व्यक्तींसाठी आवश्यक असलेल्या इतर सुविधांवर चर्चा झाली. अनेक संस्थांमध्ये या सुविधांचा अभाव असल्याचे निदर्शनास आले, त्यामुळे समितीने तातडीने उपाययोजना करण्याचे प्रियांका जारकीहोळी यांनी आदेश दिले.

शैक्षणिक साहित्य आणि डिजिटल सुविधांमध्ये अपंगांसाठी विशेष सोय: अपंग विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे सोपे व्हावे यासाठी शैक्षणिक साहित्य आणि डिजिटल सुविधांमध्ये आवश्यक बदल करण्यावर जोर देण्यात आला. NCERT, UGC आणि इतर संस्थांच्या मार्गदर्शक सूचना आणि धोरणे: NCERT, UGC आणि इतर संबंधित संस्थांनी अपंग विद्यार्थ्यांसाठी तयार केलेल्या मार्गदर्शक सूचना आणि धोरणांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन प्रियांका जारकीहोळी यांनी केले

सरकारी आणि खाजगी उच्च शिक्षण संस्थांमधील सुविधा मानकांची अंमलबजावणी करण्यात यावी तसेच सरकारी आणि खाजगी उच्च शिक्षण संस्थांमध्ये अपंग विद्यार्थ्यांसाठी आवश्यक सुविधा आहेत की नाही, याची तपासणी करण्यासाठी एक विशेष समिती नेमण्यात यावी, अशी सूचना मांडण्यात आली. देशातील अपंग व्यक्तींना समान संधी मिळाव्यात, यासाठी समितीने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आणि सरकारला तातडीने कार्यवाही करण्याची शिफारस खास. प्रियांका जारकीहोळी यांनी केली.

Tags: