Belagavi

क.सा.प. बेळगाव जिल्हा शाखेचा विशेष कार्यक्रम

Share

कर्नाटक साहित्य परिषदेच्या बेळगाव जिल्हा शाखेच्यावतीने, तसेच कन्नड सांस्कृतिक भवन कल्याण संघाच्या संयुक्त विद्यमाने विशेष साहित्यिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

ज्येष्ठ साहित्यिक शि. गु. कुसुगल यांच्या जीवनकार्यावर आधारित अभ्यासपूर्ण व्याख्यान झाले. कार्यक्रमात डॉ. एच. बी. कोळकर यांनी शि. गु. कुसुगळ यांच्या साहित्यिक योगदानावर सखोल विवेचन केले. नाटक, कला, साहित्य, लघुरूप, व्यक्तिचित्रण, सांस्कृतिक लेखन, लोकसाहित्य अशा विविध साहित्यप्रकारांमध्ये त्यांनी दिलेली सेवा खरोखरच अद्वितीय आहे, असे ते म्हणाले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक य. रु. पाटील होते. त्यांनी आपल्या भाषणात ज्येष्ठ साहित्यिक शि. गु. कुसुगल यांच्या साहित्यसेवेचा गौरव करताना सांगितले की, काही साहित्यिक अध्यापनातून येतात तर काही जीवनातील अनुभवातून. शि. गु. कुसुगल हे दुसऱ्या प्रकारात मोडतात. जीवनअनुभवातून पल्लवित झालेल्या साहित्यसेवेचे ते सुंदर उदाहरण आहेत, असे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमात लेखिका संघटनेच्या माजी अध्यक्षा जयशीला ब्याकोड, तसेच क.सा.प. जिल्हा शाखेचे मानद सचिव एम. वाय. मेणसिनकायी यांनीही मनोगत व्यक्त केले.

या वेळी क.सा.प. तालुकाध्यक्ष सुरेश हंजी, प्रकाश अवलक्की, बसवराज सुणगड, अ. ब. इटगी, बी. बी. मठपती, मंजुळा कुसुगळ, बी. डी. हंचिनमणि, आर. सी. गाणिगेर, एम. के. मलाबादे, सचिन संपगावी यांच्यासह क.सा.प.चे अनेक पदाधिकारी व साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. वीरभद्र अंगडी यांनी स्वागत केले, आर. बी. बनशंकर यांनी प्रस्तावना मांडली, डॉ. हेमा सोनोळ्ळी यांनी सुत्रसंचालन केले तर शिवानंद तल्लूर यांनी आभार मानले.

Tags: