Belagavi

देवलापूरच्या रूपा पाटीलचा दहावी परीक्षेत राज्यात डंका

Share

दहावीचा निकाल जाहीर झाला असून, बेळगाव जिल्ह्यातील रूपा पाटील हिने राज्यात प्रथम क्रमांक पटकावत जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले आहे. तिने ६२५ पैकी ६२५ गुण मिळवून ऐतिहासिक यश संपादन केले आहे.

बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल तालुक्यातील देवलापूर गावातील शासकीय शाळेतील विद्यार्थिनी रूपा पाटील हिने दहावीच्या परीक्षेत ६२५ पैकी ६२५ गुण मिळवत राज्यात पहिला क्रमांक मिळवला आहे. तिच्या या अपूर्व यशामुळे संपूर्ण जिल्ह्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

रूपाने आपल्या कठोर मेहनती, चिकाटी आणि अभ्यासाच्या बळावर हे यश मिळवलं आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थिनीही शिक्षणात सर्वोच्च शिखर गाठू शकतात, याचा ठोस पुरावा म्हणून तिच्याकडे पाहिले जात आहे.

Tags: